माणसाच्या वर्दळीत,
का वाटते एकाकी …
जग फिरते भोवती,
तरीही एकाकी ही जगरहाटी ….
एकटी ती खिडकी,
एकटा तो वारा …
एक एकट्या नभात ,
एकटा तो तारा…
रातराणीचा सुगंध,
रात्री तो एकटा…
सूर नाही सोबतीस,
शब्दही भासे एकटा…
उसळलेल्या लाटा मनात,
भेटती त्या सागरास…
तरीही हा किनारा,
का भासे एकटा …
चिमणी -पाखरे सोबतीस ,
तरीही दिशा वेगळ्या…
सोबतीस असून प्रवासी ,
तरीही वाटा या मोकळ्या…
एकाकी मनाच्या संवादातून ,
कविता अशी जन्मते …
एकाकी मन हे ,
नेहमी ‘एकाकीच’ असते…