सावळे रूप मनोहर जन्मले देवकीच्या उदरी
गोकुळ दिनरात गाजवले राहून यशोदेच्या पदरी …..
बांधले गेले उखळाला ,तरी दाविले ब्रम्हांड मुखातूनी
चोरले दही दूध लोणी, गेल्या गोपिका त्रासूनी…..
झाला तो मीरे ची भक्ती आणि सुदाम्याची शक्ती
त्याच्या नामस्मरणामुळे मिळे सर्व पापातून मुक्ती. …
कंस कालिया चा केला संहार , झाला गोवर्धनाचा तारणहार
अभिमन्यूच्या पराक्रमाचा तू साक्षीदार, पांडवांची तुझ्यावर मदार….
करितो रासलीला, लेवूनी ओठांवर बासरी
सारथी तो अर्जुनाचा, रणभूमीचा चक्रधारी…..
जरी सावळा असे तुझा वर्ण ,परी मधुर ताना छेडसी आकर्ण …..
द्रौपदीचा बंधू तू पूर्ण, परी राधेचा सखा अपूर्ण….
घेऊनी अवतार आठवा ,विष्णूचे तू रूप नवे
सर्व बहिणींच्या भाग्यामध्ये तूझ्या सारखे भाऊ हवे……
वसला आहेस कणाकणांत तू, प्रत्येक हृदयात तुझा वास
करू साजरा जन्मदिवस ,मनाला लागे तुझी आस……..
कहत कवी पूजा….. केली नव्या पध्दतीने भक्ती
स्वीकार करावा तयाचा, द्यावी या लेखणीस शक्ती…..
_ पूजा पैठणकर( कुलकर्णी) .