मनात माझ्या या ,
काहूर का माजले….
किती समजावले ,
तरी डोहात ते पार बुडाले….
रिते होते मन सांजवेळी ,
जसे निरभ्र आकाश….
पाखरे ही परतुनी जाती,
घेऊन संधीचा प्रकाश…..
डोहात त्या मनाच्या ,
दाटे आठवणींचा मेळा ….
चांगल्या -वाईट प्रसंगांच्या,
गुंफल्या जाई माळा….
वाईट आठवणींसोबत,
मन डोळ्यातून वाहते ….
सोनेरी क्षण ते घेऊन ,
मन झोपेतही मिरवते…
वय वाढते शरीराचे,
मन अजूनही अल्लड ….
परि घेऊन मायेने जवळ ,
मीच माझ्या कुशीत….
झाले मन सज्ज ,
करून अनुभवाची ढाल….
पुन्हा नवी उमेद ,
विसरूनी संधीकाल….
– पूजा कुलकर्णी- पैठणकर