वयाच्या उमेदीच्या काळात केली गेली शिक्षक पदवी प्रदान…
आज पर्यंत केलत निस्वार्थपणे विद्यादान….
शैक्षणिक खात्यात राहून केले तुम्ही विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन ….
प्रेम ,बंधुता ,शिस्त ,नियम ,शिकवले तूम्ही वेळेचे नियोजन….
सरस्वती मातेचे दूत होऊन दिलात तूम्ही ज्ञानाचा वसा …
नक्कीच आम्ही चालवू हा पुढे वारसा….
नवो उपक्रमाचे दिले धडे…
त्यासाठी लावावे लागले स्वर तुम्हाला तुमचे जरा खडे….
अन्यायाला न जुमानता सत्याने वागणे….
तुणचे शब्द म्हणजे माणूसकीचे धडे …
कामाचे परफेक्शन चौफेर दृष्टी ….
शाळेची तू्म्ही फुलवली सृष्टी…
तुमच्यामूळे पाहता आला मला परिसर….
भविष्याकडे पाहण्याची दिलीत तूम्ही वेगळीच नजर …..
आयुष्यात कधीही कमी पडणार नाही असे दिलेत ज्ञान. ….
मातृत्व आणि कर्तृत्व यांचा समतोल साधता येईल छान. …
देताना निरोप शाळेला आले असतील भरून डोळे
३३ वर्षातील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील
सोनेरी पाने…