कौल!!!

जवळपास महिनाभरापूर्वी कांदेपोहे चा कार्यक्रम आटोपून, हो नाही करत “त्या” दोघांचे लग्न ठरले. दोन्ही घरच्यांनी होकाराचे त्या दोघांवरच सोडले होते. लग्नात हुंडा , मानपान नको म्हणाले हे ऐकून नव-या मुलाबद्दल आणि इतरसर्वांच्या बद्दल आदर वाट ला,आणि घरचे मोठे मनोमन सुखावले.

फार अपेक्षा तिच्या नव्हत्याच. तो असा काही फार हँडसम वगैरे नव्हता, तिच्यापेक्षा उंच, थोडा काळासावळा, शांत असावा तिचे निरीक्षण होते. होकारापूर्वी किंवा नंतरही त्याला भेटल्यावर तिला सिनेमात दाखवतात तसे काही वाटलच नव्हते. असे खूप धकधक वगैरै तर नाहीच. उलट भेटल्यावर बोलताना तिच्या भाषेत बोलायचे तर ती ‘ max awkward ‘ झाली होती. लक्षात राहिले ते त्याचे मनापासून हसणे. आता हे मैत्रिणींना सांगितल्यावर मैत्रिणीना तिची काळजीच वाटू लागली…” होपलेस् आहेस..” असा मैत्रिणीचा शेरा तिच्या पदरात पडला तो त्याच्याचमुळे..ती वैतागली.. मीच कदाचित ती राजकुमारी नसावे जिच्यासाठी कोणी knight in shining armor दौडत यावा..असा तिने निष्कर्ष काढला. शेवटी तिला वाटू लागले आपण करतोय ते बरोबर की केवळ घरच्यांचा मर्जीखातर?

” दोन दिवसांनी साखरपुड्याच्या खरेदीला जाऊया ” असा सासरहून फोन आला. दोघांनाही भेटण्यासाठी एवढे कारण पुरेसे होते ,
मग काय…दोघांचे दोन वेळा फोन झाले. चॅटिंग झाले.
तिच्या सासरच्यांनी अंगठी घेण्याचा सोहळा अगदीच किरकोळीत आटोपला. त्यांनी ऑलरेडी ‘ His & Her ‘ सेट घ्यायचे असे ठरवले होते. दोघांच्या घरच्यांच्या काॅमन पसंतीचे काही सेट होते त्यातला दोघांनी एक फायनल केला. आणि सर्व जण केवळ तासाभरात त्या अलिशान दुकानातून बाहेरही पडले. तिचा विश्वासच बसेना खरेदी अशी पण असते. ती गप्प राहिली. तिला परत वाटलं चूक केली आपण बहुतेक..

बघत बघत साखरपुड्याचे दिवस उजाडला , सगळीकडे लगबग होती ,पाहुण्याची रेलचेल चालू होती , काही पाहुणे आधीच आले होती , काही पोहोचत होते , आईं बाबाचा आनंद गगनात मावत नव्हता …..सगळे अगदी स्वप्नसारखे दिसत होते …….
आणि तिच्या फोन वर एसएमएस आला ……..
” निघालोय….. तुला माझी करून घेण्यासाठी ….”
तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना ,तिला ती स्वतः राजकुमारी असल्याची जाणीव झाली , आणि तो राजकुमार जो पांढर्या घोड्यावर स्वार होऊन येत होता…..
मनाने त्याक्षणी कौल दिला आपला निर्णय नाही चुकला…

साखरपुडा पार पडला ……. आणि लग्नाची तयारी करत करत दिवस असेच निघून गेले …..आणि लग्नाची तारिख जवळ आली ……लग्न त्याच्या गावी करण्याचे ठरले होते म्हणून मुलीकडचे प्रवास करून तिकडे जाणार होते …..
तिला वाटले तिच्या मनाचा कौल त्याला द्यावा , तेव्हा तिने त्याला टेक्स्ट मेसेज पाठवला,
” निघालीय …..कायमची तुझी होण्यासाठी ….”
ते पाठवता असताना सगळे जण तिच्या कडे मिश्किल नजरेने पाहत होते …. ती गोंधळली… मनातच म्हणाली

” कोणी कौल देते , क्षणाला जरासे,
सख्या मोह झाले , मनाला जरासे …….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *