नमस्कार लेखक/लेखीका

आम्ही घेऊन येत आहोत ,सर्व नवोदित लेखकांसाठी स्वतःचे व्यासपीठ, ” शब्दस्पर्श “.

प्रत्येकाच्या भावनांचा मनाला होणारा स्पर्श हा शब्दात व्यक्त करणं प्रत्येकाला जमतच असं नाही, म्हणून ते ज्याला जमतं, जाणवतं, उमगतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पानावर उतरवता येतं, मग ते कोणत्याही स्वरूपात असेना ……अश्या तुमच्या आमच्यातल्या प्रत्येक लेखकांसाठी खुले व्यासपीठ “शब्दस्पर्श”.

तुम्हा सर्वांच्या नवनवीन कथा वाचून जाणवले की या शब्दांना त्यांची वेगळी जागा मिळायला हवी तेव्हा आमचा प्रवास सुरू झाला ….
तर आता हा प्रवास एका मोक्याच्या जागी येऊन थांबला आहे , इथून आपल्याला सोबत पुढे जायचे आहे ….

म्हणून सर्वांना आवाहन आहे की आपले कथालेख आम्हाला editor@shabdasparsha.com येथे पाठवा .

” तुमचे कथा लेख , मांडा ठळक,
शब्दस्पर्श देईल, तुम्हास ओळख …..”